सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव तालुक्यातील गौराळा येथील स्मशानभूमी च्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामवासियांनी खडीकरण व मजबुतीकरण करून कायम स्वरूपी रस्ता बांधून देण्यात यावा व मयत व्यक्तीचा शेवटचा प्रवास तरी सुखमय व्हावा यासाठी प्रयत्न प्रशासनाने दुर्लक्ष न करता जातीने लक्ष देऊन करावे अशी आर्तहाक नागरिकांची आहे. तूर्तास पंचायत समितीच्या या गलथानपणाला गावाकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
परिणामी वारंवार निवेदन देत सदर बाब संबंधितांच्या लक्षात आणून दिली तरी देखील प्रशासनाने ही बाब गंभीर्याने घेतली नसल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर गेडेकार यांनी आज मंगळवारपासून पंचायत समितीचे समोर उपोषण सुरु केले आहे. यावेळी अनेकांनी उपोषण स्थळी भेट देत मागणी केली.
■ स्मशानभूमी रस्त्याच्या दुर्दशेबद्दल आम्ही गावाकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा. तसेच तात्पुरत्या स्वरूपात काम न करता कायमस्वरूपी खडीकरण व मजबुतीकरण देण्यात येत नाही तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरु राहील -सोमेश्वर गेडेकार, उपोषणकर्ते
■ निधी उपलब्ध करून स्मशान भुमीच्या रस्त्याचे काम प्राधान्याने करून देण्यात यावे.आकाश बदकी, नगरसेवक नगरपंचायत, मारेगाव
गौराळा स्मशानभूमी रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 25, 2023
Rating:
