टॉप बातम्या

दुचाकीस्वारास अज्ञात वाहणाची धडक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज सोमवार दि.10 एप्रिल रोजी सायंकाळीच्या सुमारास वणी-मारेगाव राज्य महामार्गावरील इंडियन पेट्रोल पंप च्या नजीक अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जंखमी झाला. 
बबन रघुनाथ सुर रा. कोलगाव (46) असे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जंखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ह्या दुचाकीस्वारास उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, त्याचे वर डाक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे  हालविण्याचा सल्ला दिला.
जखमीस ताबडतोब चंद्रपूर येथे हालविण्यात आले असून, या दुर्घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.
Previous Post Next Post