सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : आज दिनांक 11 एप्रिल 2023 ला आनंद बालसदन लालगुडा येथे बहुजन स्टुडंट्स फेडरेशन तर्फे ज्योतिराव फुले यांची जयंतीसाजरीकरण्यात आली. यामध्ये बालसदन येथील बालकांना त्यांच्या उज्वल भविष्याकरिता मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यातून बालकांनी प्रेरणा घेऊन ते यशस्वी नागरिक होतील असे बालकांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शैक्षणिक साहित्य, कपडे व किराणा साहित्य यांचे वाटप करण्यात आले. यामुळे बालकांचा आनंद द्विगुणित झाला.
या कार्यक्रमात करिता मा राहुलजी खापर्डे वकील वणी, मा अनिल भाऊ भोंगडे, मा अनिल भाऊ आसुटकर, मा अशोक अंकतवार, मा राहुल वेले व मा अर्चनाताई गजभिये व प्रकाश चहानकर व गेडाम भाऊ यांनी या कार्याला सहकार्य केले. या फेडरेशन च्या माध्यमातून वंचित व तळागाळातील गरजू मुलांची प्रगती व्हावी व ते यशस्वी जीवन जगावे या हेतूने हा बहुजन स्टुडंट्स फेडरेशन वणी तालुक्यात कार्य करीत आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी माणसाला माणुस म्हणून जगता यावे, एकमेकांना मदत करावी असे मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.