सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त शहरात विविध सामाजिक संघटना तसेच माळी समाजाच्या वतीने समाजसुधारक क्रांतिसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जयंती निमित्त सायंकाळी भव्य स्वरूपात रॅली काढण्यात आली. यावेळी शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.