सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना व प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना या निवडणूकीतील उमेदवारावर जिवघेणा हल्ला होणे म्हणजे विरोधकांची राजकीय नितिमत्ता किती खालच्या पातळीवर गेली याचा अंदाज येत आहे.
राजकारणात विरोध होत असतो पण तो विचाराचा विरोध असतो पण वरोरा भद्रवती विधानसभा क्षेत्रात काही गुंड प्रवृत्ती आपली राजकीय सत्ता अबाधित राखण्यासाठी गुंडशाहीवर उतरली असल्याने इथे राजकीय वैर कुणाच्या जीवावर बेतेल याचा नेम नाही. दरम्यान, दत्ता बोरीकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून हा हल्ला कुणी केला त्याचा शोध पोलिसांनी लवकर घ्यावा व त्या गुंडाना बदडून काढावे अशी मागणी होत आहे.
दत्ता बोरीकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती कारण्यात आले आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकारी आता आक्रमक झाले असून या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटणार असल्याने त्यांची पुढील काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुखांवर प्राणघातक हल्ला...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 25, 2023
Rating:
