Top News

वरिष्ठ लिपिक बाबाराव सूर यांचे उपचारादरम्यान नागपूर येथे निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मौजा कोलगाव येथील पतसंस्थेचे कर्मचारी वरिष्ठ लिपिक बाबाराव रघुनाथ सूर यांचे उपचारादरम्यान नागपूर येथे आज शनिवारी 11.30 च्या दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय (52) वर्षाचे होते. त्यांच्या दुःखद अपघाती निधनाने शालेय कर्मचारी वर्तुळात पुरती शोककळा पसरली आहे.
जिल्हा परिषद शालेय कर्मचारी पतसंस्था 101 चे वरिष्ठ लिपिक बाबाराव सूर रा. कोलगाव यांचा सोमवार दि 10 एप्रिल ला सायंकाळी च्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली होती. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर होती, दरम्यान त्यांचेवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. बाबाराव हे गेल्या चार दिवसापासून उपचार घेत असतांना त्यांची आज पाचवा दिवशी रोज शनिवार ला सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान त्यांनी अखेर श्वास घेतला आणि सूर कुटुंबियांवर दुःखा चे डोंगर कोसळले. 


Previous Post Next Post