मारेगाव बाजार समिती ची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने, राजकीय वर्तुळात चर्चा...!!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काँग्रेस सेना आघाडी समर्थित पॅनल लढत आहे. तर त्यांच्या विरोधात भाजप समर्थित इतर सर्व विरोधक एकत्र आलेले आहे. काँग्रेसकडून अनेक वजनदार नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही असंतुष्टांनी भाजपशी सूत जुळवीत उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत रोचक व चूरशीची होणार असे दिसते.

येत्या 30 एप्रिलला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणुक होत आहे. या निवडणुक मैदानात शेतकरी परिवर्तन तथा शेतकरी एकता पॅनल आमने सामने दंड थोपटून उभे आहेत. या निवडणूक मैदानात दोन्ही पॅनल कडून 34 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे गेल्या काही वर्षाच्या इतिहासात ही निवडणूक पहिल्यांदाच रंगतदार होताना दिसत आहे. 

नेहमी अविरोध होणाऱ्या यंदाच्या निवडणूकीत बाहुबली उमेदवारांनी परस्पर विरोधात दंड थोपटले असून विजय आपलाच असे दावे प्रतिदावे दोन्ही पॅनल कडून केल्या जात असले, तरी दोन्ही पॅनल कडून प्रचाराची रणधुमाळी डोअर टू डोअर सुरु झाली आहे. अवघ्या चार दिवसानंतर प्रचाराचा कार्यक्रम क्लोज होईल, त्यामुळे कोण कोणाच्या क्लोज येतील हे आता सांगणे नक्की जरी नसले तरी, मारेगाव बाजार समितीची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने वाटचाल करित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. 



मारेगाव बाजार समिती ची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने, राजकीय वर्तुळात चर्चा...!! मारेगाव बाजार समिती ची निवडणूक शेतकरी परिवर्तन पॅनल च्या दिशेने, राजकीय वर्तुळात चर्चा...!! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 24, 2023 Rating: 5
Powered by Blogger.