सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका अल्पवयीन मुलीचे शोषण करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना वणी येथे घडली असून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पवन गणेश मेश्राम (24) रा. खडबडा, वणी असे आरोपीचे नाव आहे. शहरातील आरोपीला बुधवारी (ता.12 एप्रिल) सकाळ ला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या व पांढरकवडा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
"आरोपी हा मागील एक वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या मावशीने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीला अटक केली. पवन गणेश मेश्राम (24) रा. खडबडा मोहल्ला असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पिडितेची प्रकृती गंभीर असल्याने तिला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे."
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन पिडीतचे शोषण करणाऱ्या तरुणाला अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 14, 2023
Rating:
