मारेगाव | विवेक तोडासे
मारेगाव : करंजी बोटोणी राज्य मार्गावर बोटोणीजवळील पेट्रोल पंपा नजिक 22 एप्रिल ला रात्री 8 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सूर्यभान बापूराव आत्राम वय (४५) रा मेंढणी ठार झाले.
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार करंजी बोटोणी राज्य महामार्गावर मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोटोणी व जळका यांचे दरम्यान सुर्यभान बापुराव आत्राम वय ४५ हे आपल्या मोटारसायकल ने करंजी येथुन रात्री आठ वाजता सुमारास बाजार घेऊन गावी जात होते, दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुर्यभान हे गंभीर जखमी झाले त्यांना प्रथम करंजी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
करंजी ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित केले. त्यांचे पच्छात पत्नी, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे.
राज्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सूर्यभान आत्राम ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 23, 2023
Rating:
