सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पर्वावर मारेगाव येथे दरवर्षी प्रमाणे 'भीम जयंती महोत्सव 2023' चे आयोजन करण्यात आले आहे. यात 11 ते 14 एप्रिल दरम्यान वैचारिक व प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमाचे आयोजन जय भीम उत्सव समिती मारेगाव च्या वतीने करण्यात आले आहे.
यामध्ये 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम. 12 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार विकास राजा, नागपूर यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वाली. तर 13 एप्रिल रोजी प्रबोधनकार सुनिताताई किर्तने यांचा सुद्धा प्रबोधनात्मक संगीतमय मेजवानी. हे दोन्ही कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पटांगणात आयोजित केले आहे. तसेच 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वा. महामानवास अभिवादन तर सकाळी 10 वा. प्रसिद्ध व्याख्याते चंद्रा भाऊ ठाकरे यांचे बाबासाहेबांची धम्म क्रांती या विषयावर जाहीर व्याख्यान तसेच स. 11 वाजता शहरातून भव्य बाईक रॅली तर सायंकाळी 6 वाजता ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला तमाम शहरवाशियांनी उपस्थित राहून वैचारिक व प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमाचा आश्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मारेगाव येथे तीन दिवसीय 'भीम महोत्सव'
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 10, 2023
Rating:
