टॉप बातम्या

निलेशच्या समय सुचकतेने वाचले जखमी वानराचे प्राण; जखमी वानराला प्राणी मित्र हरीश कापसेंनी दिले जिवनदान!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील रेल्वे क्रॉसिंग समोर असलेल्या विद्या नगरी वसाहती मध्ये , मागील एक महिन्यापासून रस्ता भटकून आलेल्या वानराच्या जखमी पिल्लाला प्राणिमित्र हरीश कापसे यांनी जिवनदान दिले.
प्राप्त माहितीनुसार विद्या नगरी परिसरात मागील एक महिन्यापासून वानराचे एक पिल्लू कळप सोडून या भागात भटकले. हे प्रत्येकांच्या गच्चीवर जाऊन, आपला खेळ खेळत असल्यामुळे बाल गोपालांमध्ये, त्या वानराच्या पिल्लाने चांगलाच लळा निर्माण केला होता. त्यामुळे तो वानराचं पिल्लू विद्या नगरी परिसरातील एखादा सदस्य असल्याचा भास येथील नागरिकांना होत होता. परंतु मंगळावर (दि.४ एप्रिल) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास, परिसरातील मोकाट कुत्र्यांनी त्या वानराच्या पिल्लावर हल्ला चढविला.आणि त्याला गंभीर जखमी केले. ही बाब सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांना आज बुधवारला पहाटे ५ वाजताच्या सुमारास लक्षात येताच निलेश चौधरी यांनी कुठलाही वेळ घालवता वनविभागाला माहिती दिली.
तसेच शहरातील प्राणी मित्र हरीश कापसे यांना पाचारण करुन,चार तासाच्या अथक परिश्रमातून जखमी असलेल्या वानराच्या पिल्लाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी विद्यानगरी येथील अध्यक्ष अशोक चौधरी, मनोज नवघरे, विनोद आवरी, विलास समर्थ, अशोक चव्हाण, धनराज डवरे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

तूर्तास वानराचे पिल्लू हे गंभीर जखमी असल्याने,वनविभाग व प्राणीमित्र हरीश कापसे यांनी त्यास रुग्णालयात हलविले.

सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर...

दोन ते अडीच महिन्याअगोदर असेच कार्य सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरी यांनी केले होते, गणेशपूर रोडवर एक अज्ञात युवक जखमी होता. त्याला कोणीही विचारपूस करित नव्हते, मात्र निलेश चौधरी हे त्या मार्गाने भटकंती करित असतांना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या जखमी युवकाला स्वतः च्या वाहनाने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे श्री चौधरी, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();