दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे?


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोट बंदीची घोषणा करीत जुन्या १००० व ५०० च्या नोटा चलनातून बात ठरवत दोन हजाराची नवीन नोट चलनात आणली या घटनेला सहा ते साडेसहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. सुरुवातीच्या काळात दोन हजाराची नोट चांगल्या प्रकारे चलनात होती सर्वसाधारणपणे इतर नोटा चलनात दिसत असल्या तरी ग्रामीण भागात दोन हजाराची नोट चलनातून दिसेनाशी झाली आहे त्यामुळे दोन हजाराच्या नोटा गेल्या तरी कुठे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

दोन हजाराची नोट चलनात आल्यानंतर या नोटा सुद्धा चालण्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या मात्र मागील अनेक महिन्यापासून ग्रामीण भागात दैनदिन व्यवहारात दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण कमी प्रमाणात दिसत आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणी येत आहेत बँकेच्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा ग्राहकांना ५००, २००, १००, ५०, २० या रुपयाच्या नोटा दिल्या जात आहे दोन हजाराची नोट बाजारात दिसत नसल्यामुळे या नोटा बाजारातून गेल्या तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

चलनातून गायब झालेले या नोटा एटीएम मधूनही दिशेनाशा झाल्या आहेत ग्रामीण भागातील अनेकांनी दोन हजाराची नोट काही महिन्यापासून बघितली नसल्याचे सांगितले जाते आहे. तर व्यापारी वर्गालाही दोन हजाराची नोट व्यवहारात येत नसल्याचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाबाजार थांबविण्याच्या उद्देशाने नोटबंदी घोषित केली होती या निर्णयाविरोधात तीव्र संतापही व्यक्त करण्यात आला यामुळे अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला होता मात्र आता चलनातून दोन हजाराची नोट गायब झाल्यामुळे सदर नोट गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बँक एटीएम मधूनही दर्शन नाही

केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या होत्या त्यावेळी दोन हजार रुपयाची नोट चलनात होती मात्र अवघ्या सहा साडेसहा वर्षाच्या कालावधीत दोन हजाराची नोट चलनातून गायब झाली आहे विशेष म्हणजे बँक व एटीएम मधून ही नोट हद्दपार झाल्याचे चित्र आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे? दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे? Reviewed by सह्याद्री चौफेर on April 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.