सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : नियम डावलून धावणाऱ्या ट्रॅव्हल्स बंद करण्याच्या मागणीसाठी येथील युवक नवाझ शरीफ कादीर शरीफ यांनी मंगळवारी दुपारी पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते नवाझ शरीफ म्हणाले की, मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 78 मध्ये खासगी प्रवासी वाहन कसे? कोणत्या गाड्या धावणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वणी -यवतमाळ रस्त्यावरील धावणाऱ्या गाड्या नियमांना बगल देत या ट्रॅव्हल्स धावत आहेत. त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. या विरोधात प्रवाशांनी आवाज उठवला असता ट्रॅव्हल्सचे कर्मचारी त्यांना शिवीगाळ करून गैरवर्तन करतात. मात्र पोलीस, आरटीओ, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. याबाबत एसपींनी, उपप्रादेशिक, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, खासदार बाळू धानोरकर आदींसह परिवहन अधिकारी यवतमाळ, रापनिचे विभागीय नियंत्रक आदींकडे तक्रारी केल्या, मात्र आज उपोषणाचा दुसरा दिवस उजाळला असूनही कोणीही या कार्यवाहीसाठी धजावले नाही.
आमदार बोदकुरवार यांनी दिल्या कारवाईच्या सूचनानवाझ शरीफ कादिर शरीफ हे मंगळवारी दुपारी तीन वाजता पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि पवार, परिवहन विभागाचे एसएचओ राजेश पुरी यांच्याशी बोलून सूचना केल्या. याप्रकरणी योग्य ती कारवाई करा मात्र, या आश्वासनानंतरही उपोषणकर्त्यांचे उपोषण सुरूच आहे. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह दिनकर पावडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.