सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील पहापळ येथील कर्तव्यदक्ष विद्यमान सरपंच यांच्या विरोधात असंतुष्ट सदस्यांच्या वतीने अविश्वासाचा प्रस्ताव निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आला होता. 21 मार्च रोजी सरपंच राहुल आत्राम यांच्यावरील अविश्वास ठराव संदर्भात बैठकीचे आयोजन दुपारी 2 वाजता करण्यात आले होते.
सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी अविश्वास बहुमत ठराव सिद्ध करण्यासाठी सहा सदस्यांची आवश्यकता होती. परंतु असंतुष्ट सदस्यांची संख्या सहापेक्षा कमी असल्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर झाला. त्यामुळे विरोधकांचा अविश्वास ठराव तोंडघशी पडला म्हणायला हरकत नाही.
मारेगाव तहसीलदार दिपक पुंडे यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती, दरम्यान विद्यमान सरपंचासह सदस्य उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पुंडे यांनी बैठकीला सुरुवात करून बैठकी बाबत कल्पना व सुचना दिल्यानंतर अविश्वास ठरावासाठी सहा सदस्यांची आवश्यकता होती. मात्र, यावेळी चार सदस्यांनी हात वर केले. यात भैय्याजी कनाके, साधना मोहितकर, हरिश्चंद्र ठाकरे, चंदा गेडाम यांचा समावेश असून या असंतुष्ट सदस्यांचा अविश्वास ठराव अखेर नामंजूर करण्यात आला.
गेले काही दिवस चाललेल्या विद्यमान सरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव "मंजूर की नामंजूर" याकडे नागरिकांचे लक्ष लागले असतांना अविश्वास ठराव घडामोडीना आता पूर्णविराम मिळाला आहे.
माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे असून सर्व कामे मार्गी लावली असतांना कुठल्याही कामात दिरंगाई नसून मी आणि माझे सहकारी जनहिताचे काम करण्याचा प्रयत्न करित असतांना हे विरोधकांना खटकतात. मात्र, मी असल्या तथ्यहीन आरोपांकडे लक्ष न देता गावाच्या विकासाकडेच माझे आणि माझ्या सहकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. हा विजय माझा नसून सत्याचा विजय आहे.- राहुल आत्रामसरपंच, पहापळ ग्रामपंचायत, पं स मारेगाव
अखेर पहापळ येथील विद्यमान सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 23, 2023
Rating:
