हिस्ट्री : वणी मारेगाव तालुक्यात हृदयद्रावक घटना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नूतन वर्षाचं स्वागत केलं गेलं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात झाली असताना नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला गेला, नववर्षात समृद्धी, आपलं जीवन आरोग्यदायी जावो.. अशा एकीकडे शुभेच्छाच्या वर्षावाची देवाणघेवाण होत असतांना मात्र, काहींना हे नववर्ष रडवून गेलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

काल अतिशय मन सुन्न करणाऱ्या घटना घडल्या. डॉक्टर दांपत्य या जगातून कोवळ्या बाळाला पोरकं करून देवाघरी निघून गेले, वडगाव परिसर (ता. वणी) येथील सुशिक्षित विधवा महिलेने मृत्यूला कवटाळले, युवा शेतकऱ्याने (ता. मारेगाव) विषाचा घोट घेवून आपली जीवनयात्रा संपवली हे सर्व नववर्षात जिल्ह्यासह वणी-मारेगाव तालुक्यातील जनतेला अस्वस्थ करून सोडले. या सर्वांच्या चिता ताज्या असतांना आज दि.23 मार्च रोजी वेळाबाई येथील सूर्यभान कुमरे (60) या इसम हृदय विकाराच्या धक्याने मृत पावला ही घटना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील (ता. वणी) आहे. तर आजच दुपारी 4. वाजता हायवा या भरधाव जड वाहनाने दुचाकी ला धडक दिल्याने वांजरी (ता. वणी) येथील नीरज आत्राम (28) हा जागीच ठार झाला, तर संदीप सिडाम (30) रा वांजरी (ता. वणी) हा गंभीर जखमी असल्याचे समजते. ही घटना ताजी असतांना सालेभट्टी (ता. मारेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाचे काम आटोपून जेसीबी मशीन मारेगावकडे येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारास मशीनने जोरदार धडक देत सालेभट्टी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज गुरुवार संध्याकाळी साडे सात वाजता दरम्यान घडली.
     
शिवम नामदेव आत्राम (20) असे या जेसीबी अपघातात मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. शिवम हा घरगुती कामानिमित्त मारेगाव येथे आला होता. सायंकाळी गावाकडे दुचाकीने परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबी मशीनने मांगरूळ-सालेभट्टी रस्त्यालगत त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने शिवम हा जागीच ठार झाला.
    
गुढी पाडवा व नववर्षाच्या पर्वा वर अशा हृदयद्रावक, मन हेलावून टाकणाऱ्या विविध घटना घडल्याने उपविभागीय क्षेत्रात पुरती शोककळा पसरली असून वणी-मारेगाव (जि. यवतमाळ) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
हिस्ट्री : वणी मारेगाव तालुक्यात हृदयद्रावक घटना हिस्ट्री : वणी मारेगाव तालुक्यात हृदयद्रावक घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on March 23, 2023 Rating: 5
Powered by Blogger.