सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने व जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात वाढती महागाई व वाढलेल्या गॅसच्या दरवाढीविरोधात येथील शिवाजी चौकात महागाई विरोधात आंदोलन करीत मोदी सरकार चा निषेध करण्यात आला. गणपत लेडांगे म्हणाले, ‘‘सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस एक हजार पार झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीने नागरिकांचे घर चालविण्याचे बजेट कोलमडले आहे. सर्वसामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली आहे. कॉंग्रेसच्या काळात तीनशे रुपयांचा गॅस तीस रूपयाने दरवाढ झाल्यावर आक्रोश करून सत्तेत बसलेले भाजपाई आत्ता कुठे आहेत. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे
नोकरदार, शेतकरी, शेतमजूर कामगार देशोधडीला लागतांना दिसत आहे. जीवन मरणाचा प्रश्न त्याच्या समोर उभा ठाकलेला असताना केंद्र शासन कोणतीही उपाययोजना करताना दिसत नसल्याने यात मोठा उदेश निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जीवनावश्यक वस्तु सोबतच इंधनाची होत असलेली वाढ वाढलेले दर यामुळे आर्थिक अस्थीरता निर्माण झाली आहे. त्यात सातत्याने वाढणान्या बेरोजगारीने संपूर्ण राज्यात अवर निर्माण झाले आहे महागाईने उच्चांक गाठलेला असतांना शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, हरभरा या भाव सरकारच्या धोरणामुळे पडले आहेत. अन्य देशात याचे दर वाढलेले असताना आपल्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत देश व राज्यात सतत वाढत असलेली महागाई याचा तिव्र निषेध करण्यात आला असुन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आली असून केंद्र व राज्य सरकारने तातडीने महागाई कमी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी योगिता मोहड, सुनंदा गुहे,सविता आवारी, सीमा आवारी ,रुपाली कातकडे,सुनील कातकडे,संजय निखाडे,शरद ठाकरे,रवी बोडेकर,सुधीर थेरे,विक्रांत चचडा,महेश चौधरी,अजय चन्ने, कुणाल लोणारे,सचिन पाटील, राजु खामनकर,संभा मत्ते,गोपी पुरावर,प्रशांत बल्की,गणपत लेडांगे,राजु गोलाईत,धर्मा काकडे,नरेश कोठारी, सोनू पावडे,आयुष ठाकरे,प्रसाद ठाकरे,स्वप्नील ताजने,जीवन डवरे, अनिता विधाते, वनिता टोंगे, वनिता सिडाम, पुष्पाताई भोगेकर व या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक महिला शिवसैनिक उपस्थित होते
महागाई विरोधात शिवसेनेचे वणीत निषेध आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2023
Rating:
