राजकीय प्रवासात समाज माझ्या पाठीशी राहिला - खासदार बाळू धानोरकर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला खासदार पदापर्यंत मजल मारता आली. या प्रवासात सर्व समाज माझ्या पाठीशी राहिला. त्यामुळेच यश गाठता आले.  आयुष्यात कधीही समाजाचे ऋण विसरणार नाही, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 

धनोजे कुणबी समाज बहुउद्देशिय संस्था, मार्डी ता. मारेगांव जि. यवतमाळतर्फे धनोजे कुणबी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्डी (ता. मारेगांव) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी खा.धानोरकर यांनी मार्डी त.मारेगाव येथील समाज भवणासाठी 51 लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विश्र्वास नांदेकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष कुळसंगे, रंगनाथ स्वामी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे, माजी जिल्हा परिषद सभापती अरूणाताई खंडाळकर, मारेगांवचे नगराध्यक्ष मनिष मस्की, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय आवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती वसंतराव आसुटकर, मार्डीचे सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, अशोक धोबे , रवींद्र धानोरकर, गजानन खापणे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकर, प्रामुख्याने उपस्थित होते. 

    धनोजे कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था मार्डीच्या वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुभाष पिंपळशेंडे, किशोर सुर, मनीषा नागपुरे, डिमनताई टोंगे, चंद्रशेखर आवारी, मोहन जोगी, गंगाधर ठावरी, सुनिल सोमटकर, यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक विजय अवतडे यांनी केले. तर सूत्रसंचालन दिलीप डाखरे यांनी केले.
राजकीय प्रवासात समाज माझ्या पाठीशी राहिला - खासदार बाळू धानोरकर राजकीय प्रवासात समाज माझ्या पाठीशी राहिला - खासदार बाळू धानोरकर Reviewed by सह्याद्री चौफेर on March 09, 2023 Rating: 5
Powered by Blogger.