टॉप बातम्या

महागांव-सिंधी पाणंद रस्त्यांच्या मार्ग होणार सुकर

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : उपसरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषद,मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.

वणी मतदार संघांचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी महागांव सिंधी पांदन रस्ताकरिता निधी मंजूर करून दिल्याने अविनाश भाऊ लांबट यांनी त्यांचे आभार मानले. लांबट यांच्या सतत च्या मागणी सह पाठपुराव्याची आमदार साहेबांनी दखल घेतली आहे. त्यामुळे महागांव सिंधी पांदन रस्त्याचा मार्ग सुकर होणार आहे असे अविनाश भाऊ लांबट यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले.

"दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्तीतून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या महत्वाच्या बाबींवर सरकारने भर दिला आहे. 

वणी मतदार संघातील दुसऱ्यांना निवडून आलेले लोकप्रिय विद्यमान आमदार यांच्याशी चर्चा करून महागांव सिंधी पांदन रस्ता देण्यात यावा यासाठी मागील काही दिवसापासून अविनाश लांबट मागणी करित होते, आवश्यक बारमाही पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो त्यासाठी आमदार बोदकुरवार यांनी देण्याचा निर्णय घेतल्याने आता पांदन रस्त्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.

अखिल भारतीय सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्या मागणीला मोठे यश आले आहे. आमदारांनी या पांदन रस्त्याकरिता 50 लाख रुपयाचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने उपसरपंच लांबट यांच्या सह महागांव सिंधी येथील नागरिकांनी आमदार बोदकूरवार यांचे आभार मानले आहे.
Previous Post Next Post