टॉप बातम्या

बोरी (गदाजी) येथे आज गोटमार यात्रा

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : विदर्भात प्रसिद्ध असलेल्या बोरी गदाजी येथे आजपासून भव्य गोटमार यात्रेला सुरुवात झाली झाली आहे.

बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षाची परंपरा आहे. गावालगत असलेल्या छोटयाशा नाल्यात श्री गदाजी महाराज यांचे मंदीर असून धुड्डीच्या (धुळवड) दिवशी येथे देवस्थान कमिटीच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात येते.

धुळवडी च्या दिवशी येथील मंदिराच्या परिसरात सकाळी कब्बड्डी खेळल्या जाते. जो गडी बाद होतो त्या गड्याची (मढ) संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. व त्याला मंदीर परिसरात आणल्या जाते. त्यानंतर प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते. मंदिराशेजारी मचान (माळा) उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात. मचानीवर असलेले भाविक जमिनीवरील भाविकांवर दगडाने मारा करतात. तर जमिनीवरील भाविक माळ्यावरील भाविकांवर दगडाचा मारा करतात. यालाच गोटमार असे म्हटलं जात असून जवळपास सुमारे 2 ते 3 तास हा खेळ लगातार असतो. जेव्हा एखाद्या भाविकाला दगड लागून जखमी होऊन भक्त खाली कोसळतो तेव्हा हा गोटमार थांबवून त्या जखमी भाविकाला मंदिरात घेवून जातात. त्यानंतर तो जखमी भक्त बरा होत असल्याचे माहिती गावकरी देतात.

आजपासून सुरू होणारी यात्रा तीन ही दिवस चालणार आहे. या प्रसिद्ध गोटमार यात्रेला तालुक्यातील भाविकांनी लाभ घेण्यासाठी रंग उधळून कूच केली आहे. 
Previous Post Next Post