सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी घेवून येत आहेत, धमाल विनोदी हास्यकलाकारांची जोरदार मेहफिल कार्यक्रम असा की पोटभर हसा.. ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव द्वारा आयोजित, स्व. प्रा डॉ माणिक ठिकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षक हास्य कलाकार रामेश्वर महाजन जुनिअर जॉनी लिव्हर मुंबई, एजाज खान इंडियाज गॉट टॅलेंटे कॉमेडीयन आर्टिस्ट, यासह साहिल दरणे कवी तथा निवेदक यांच्या उपस्थितीत हास्याची उधळण होणार आहेत.
8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6. वा. मारेगाव नगर पंचायत चे भव्य पटांगण येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच स्केटिंग मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त करणारी कु. मनस्वी पिपरे हिचे चित्त थरारक प्रात्यक्षिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ सुद्धा आहे.
होळी व धुळवडच्या पर्वावर पोट भर हसण्यासाठी या कार्यक्रमाला मारेगावकरांनी उपस्थित राहून मनमुराद आस्वाद घ्यावा असे, आवाहन ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव तर्फे केले आहे.
हास्यकलाकारांची जोरदार मेहफिल: कार्यक्रम असा की पोटभर हसा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 06, 2023
Rating:
