ऑनलाईन खेळ, रमी तीन पत्ती यासारखे जुगार कायम बंद करावेत


सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 
 
मुंबई : रमी, तीन पत्ती सारखे ऑनलाईन जुगार खेळांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
आपल्या मागणी अर्जात डॉ. माकणीकर म्हणाले की, विज्ञान विकसित होत आहे त्याच कसोटीवर इंटरनेट तंत्रज्ञानाने गरुड झेप घेतली आहे. असे असले तरी इंटरनेट वर बरेच धोकादायक खेळ चालू आहेत.
कसिनो, रमी, तीन पत्ती यासारखे जुगारचे अन्य खेळ जनतेची आर्थिक लुट करत आहेत.
या जुगाराच्या नादि लागून कुटुंबीय, नातेवाइकांकडून किंवा आता क्रेडिट कार्ड, ऑनलाइन किंवा खासगी सावकारांकडून चढ्या व्याजाने कर्ज घेत असतांना दिसून येत आहे. वारंवार हार होऊन कर्जाचा डोंगर उभा राहतो. अनेकांकडून कर्ज घेतल्याने व्यक्तीचा वेळ जुगार खेळण्यात आणि इकडचे पैसे तिकडे फिरवण्यात जाऊ लागतो. याचा परिणाम नोकरी व्यवसाय आणि कुटुंबावर होतो.
हे जीवघेणे प्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन जुगारावर कायमस्वरूपी बंदी आणावी अथवा हा जुगार कायद्याच्या चौकटीत बसवावा जेणेकरून खेळणाऱ्याला सुद्धा वचक बसावा. तसेच ऑनलाईन जुगाराच्या अँप्स वर सुद्धा प्रतिबंध आणण्याच्या सुचणा विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावं शिंदे यांना दिल्या.
ऑनलाईन खेळ, रमी तीन पत्ती यासारखे जुगार कायम बंद करावेत ऑनलाईन खेळ, रमी तीन पत्ती यासारखे जुगार कायम बंद करावेत Reviewed by सह्याद्री चौफेर on March 23, 2023 Rating: 5
Powered by Blogger.