सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील शिक्षक अतुल आत्राम यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार ला सकाळी सात वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय (४०) होते. सध्या मारेगाव येथील माधव नगर प्र क्र ५ येथे आत्राम परिवार वास्तव्यात होते.
ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सालई पोड (ता. मारेगाव) येथे कार्यरत होता. तूर्तास मारेगाव येथे वास्तव्यात असतांना मागील काही दिवसाअगोदर अचानक प्रकृती बिघडली, परंतु प्रकृती साथ देत नव्हती.
चंद्रपूर येथून चार दिवसांपूर्वी अतुल आत्राम यास नागपूर येथील न्यूरॉन दवाखान्यात भरती करण्यात आले. आज मंगळवारला सकाळी ७. वा. त्याने अखेरचा श्वास घेतल्याने मच्छिन्द्रा-मारेगाव मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.
अतुल याच्या पाठीमागे आईवडील, पत्नी व दोन मुलं, एक बहिण, एक लहान भाऊ, भावसून,जावई असा बराच मोठा आप्त परिवार आहेत.
शिक्षक अतुल आत्राम यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 21, 2023
Rating:
