टॉप बातम्या

युवकाची विष प्राशन करून आत्महत्या, खंडणी येथील घटना

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यातील खंडणी येथील एका युवकाने स्वगृही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 1 मार्च रोजी घडली. 

विजय किसन वाघाडे (22) रा खंडणी असे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने बुधवारी 1 मार्चला दुपारी राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केल्याचीघटना घडली. घटनेची माहिती वडील किसन वाघाडे व भाऊ अजय वाघाडे यांना कळताच लगेचच उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता, मात्र, उपचारादरम्यान बुधवारला सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.

त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचे पाठीमागे आई-वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. विजय यांचे पार्थिवावर आज गुरुवारी खंडणी येथे 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे असे निकटवर्तीयांनी माहिती दिली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();