अखेर अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या मागणीला यश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अखिल भारतीय सरपंच परिषद,मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. सन्मानीय आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांचा मार्गदर्शनाखाली व अविनाश भाऊ लांबट यांच्या सतत च्या पाठपुराव्याची राज्य सरकारने दखल घेतली आहे. "राज्याच्या महसूल खात्याच्याकडून आता वाळू घरपोहोच दिली जाणार आहे. यापुढे वाळू उपसा करण्याचा ठेका दिला जाणार नाही, तर सरकार स्वतः वाळू काढेल आणि ती ग्राहकांना घरपोहोच देईल अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

वणी मतदार संघातील विद्यमान आमदार यांच्याशी चर्चा करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी मागील काही महिन्यापासून अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याची मागणी होती की, घरकुल लाभार्थ्यांना त्वरित रेती उपलब्ध करुन देण्यात यावी. अशी वारंवार मागणी असतांना स्थानिक प्रशासन व महसूल विभाग यासाठी सफसेल फेल ठरत होते. तसेच स्थानिक प्रशासन व तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच या अवैध धंद्याना आळा घालू शकत नसल्याने अखेर राज्य सरकारने निर्णय घेत घरकुल यासह अन्य बांधकाम विभागाचा मार्ग मोकळा करित स्वतः घरपोच निर्णय घेत थेट लाभार्थ्यांना वाळू घरपोच पोहचवण्याचा निर्णय आज घेतला आहे. या निर्णयाने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वणी मतदार संघांचे आमदार तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्या मागणीला मोठे यश आले आहे. या निर्णयाचे स्वागत विद्यमान आमदार बोदकूरवार व उपसरपंच लांबट यांच्या समर्थकांनी तथा शहरी ग्रामीण नागरिकांनी राज्य सरकारचे केले आहे.
अखेर अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या मागणीला यश अखेर अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या मागणीला यश Reviewed by सह्याद्री चौफेर on March 20, 2023 Rating: 5
Powered by Blogger.