सह्याद्री चौफेर | राजू डावे
यावेळी जेष्ठ समाजसेवक ऋषीं पाटील मत्ते, रामदास वडस्कर, बंडू ढवस, विलासराव देवतळे, यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड भारताचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यानंतर महाराजांची पालखी काढण्यात आली, यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील सर्व महिला पुरुष तसेच युवक युवती व बालगोपाल उपस्थित होते.
या शिवजन्मोत्सव समितीचे अमोल मोहितकर, संदीप देवतळे, प्रमोद पारोधी, विशाल लांबट, प्रफुल सोनटक्के, पंकज लांबट, बबलू शेरकी, अक्षय वडस्कर, गणेश लांबट, राजू बदकी, विजय बुजाडे, नरेश ताजणे, स्वप्नील काकडे, आकाश पारोधी, अमोल शेडामे, देव तुमराम, मनोज शेडामे, आकाश वडस्कर, योगेश खामणकर, उमेश झाडे, लोकेश धानोरकर, करण सोनटक्के, वैभव बुजाडे यांनी अथक परिश्रम घेतले.