सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : तालुक्यातील बोटोणी येथे 18 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान, शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध कार्यक्रमाची रेलचेल या दोन दिवसात राहणार आहे. छत्रपती युवाशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजन केले आहे.
महोत्सवाचे उदघाटन 18 फेब्रुवारीला भा प्र से याशनी नागराजन मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार दिपक पुंडे, तर प्रमुख पाहुणे ठाणेदार राजेश पुरी, गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार पं स मारेगाव, वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, कृषी अधिकारी सुनील निकाळजे, मंडळ कृषी अधिकारी बडखल साहेब वणी, सरपंचा सुनीता जुमनाके, उपसरपंच प्रवीण वनकर यांची उपस्थिती असणार आहे.
शनिवारला सायंकाळी 6.वा. विक्रमवीर मनस्वी पिपरे हिचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता फायर बार स्केटिंग प्रात्यक्षिक होणार आहे. तसेच 7. वा. सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीप पाल महाराज यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक काढणार असून भूमिपुत्र प्रा विजय बदखल गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा संचालक इन्स्पायर अकॅडमी चंद्रपूर व वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक ऑफ इंडिया विक्रमवीर मनस्वी पिपरे या पाच वर्षीय चिमुकलीचा सत्कार करण्यात येणार आहे.
या जयंती महोत्सवी परिसरातील जनतेनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती युवा प्रतिष्ठान च्या वतीने केले आहे.