टॉप बातम्या

कला वाणिज्य व विज्ञान क. महाविद्यालय मारेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : आज कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे वर्ग 12 वि कला, वाणिज्य, व विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या निरोप समारंभ कार्यक्रमाला *अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. जिवन पाटील कापसे साहेब उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर होते व प्रमुख उपस्थिती प्रा. आवारी मॅडम, प्रा. कुरेकर सर, प्रा. मस्की मॅडम, प्रा. बेतवार मॅडम, प्रा. सातपुते मॅडम, प्रा. चिंचुलकर सर प्रा. चोपणे सर, प्रा. दानखेडे सर, प्रा. प्रविण पोटे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषानातून संस्थेचे अध्यक्ष जीपण पाटील कापसे सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात भीती न बाळगता परीक्षा शांत स्वतःरूपात देऊन जीवनात यशस्वी व्हा, अधिकारी व्हा असा आशावाद व्यक्त केला. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी झाल्यावर तुम्ही विविध ठिकाणी काम करत असताना निष्ठेने काम केलं पाहिजेत, समाजाचा काही देणं लागत हे लक्षात ठेऊन वागलं पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांनी करिअर निवडत असताना आपली क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर कराव असा मुलामंत्र दिला व परीक्षे संदर्भात माहिती दिली.तसेच प्रा. आवारी मॅडम, प्रा. कुरेकर सर, प्रा. मस्की मॅडम, प्रा. बेतवार मॅडम, प्रा. सातपुते मॅडम,  प्रा. पोटे सर,  यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व येणाऱ्या बारावीच्या परीक्षा संदर्भात माहिती दिली व तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या महाविद्यालयीन जीवनतील या दोन वर्षातील अनुभवचे कथन केले, शिक्षका प्रती आदर व्यक्त केला. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिंचुलकर सरांनी केलं व. प्रास्ताविक प्रा. कुरेकर सरांनी केले तसेच पाहुण्यांचे आभार प्रा.दानखेडे सरांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चिंचुलकर सर,निलेश बेंडे सर,विकास ढोके व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी पार पडला .
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();