सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मच्छिन्द्रा येथे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह भ प दुपारे महाराज, त्यांच्या साथीला तबला वादक आकाश कुमरे, हार्मोनियम अरुण भाऊ पेंदोर, तर साथ संगत मधुकर कुळसंगे, शामसुंदर मेश्राम, ठाकरे काका, सोमल कुमरे यांची लाभली.
दुपारे महाराज पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी रायरेश्वर वरती स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली होती आणि त्यांच्या पराक्रमाने संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली आला. शिवरायांनी देशाला आदर्श निर्माण करून दिला. स्वतःचे आरमार, स्वतःचे सैन्य निर्माण केले. शिवरायांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. आज संपूर्ण भारत देशात विविध माध्यमातून छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचा गुण गौरव होत आहे.
शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिव रॅली व पालखी सोहळ्याची सुरुवात हनुमान मंदीर ते आकर चौक मार्गे गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. या जाहीर किर्तनाला गुरुदेव प्रेमी, शिवप्रेमी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.