सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मार्डी येथे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मार्डी येथील ग्रामपंचायत, जि. प. शाळेत, हनुमान मंदिरासमोर तसेच जि प शाळेच्या मैदानावर शिवजयंती साजरी करण्यात आली. जि प शाळेच्या मैदानावर न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील डॉ प्रशांत पाटील, माजी सरपंच भास्करराव धानफुले, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेश देशपांडे, ग्रा सदस्य सुरेशजी चांगले, गणेश कनाके, ग्रा सदस्या मंगलाताई टिपले, शोभाताई कालर, छायाताई पुसाटे, बेबीताई मोहुर्ले, किसनराव चौधरी, विजय कांबळे, अखिलेश कांबळे, प्रफुल झाडे, अतुल बोबडे, राजकुमार बोबडे, विठ्ठलजी मांढरे, विनोद कालर, विलास मांढरे, नाना आस्कर, नंदू कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या शोर्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कांबळे यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन सुरेश नाखले, यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार बोबडे यांनी केले. यावेळी न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामपंचायतला भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने गावातील नागरिक व न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.