टॉप बातम्या

मग्रारोहयोची अंतर्गत कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहा., क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेट, ग्रामरोजगार सेवक संघटनेचा राज्यव्यापी संप सुरू..

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

यवतमाळ : मागील 3-4 वर्षांपासून या मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही वाढीव मानधन मिळत नसल्याने दि. 1 फेब्रुवारी 2023 पासून मागील प्रलंबित मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून कर्मचाऱ्यांचे जि प यवतमाळ च्या समोर काम बंद आंदोलन सुरू आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मागील दहा ते बारा वर्षांपासून इमाने इतबारे अखंडित मग्रारोहयोची कामे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहा., क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेट, ग्रामरोजगार सेवक करित आहेत. तसेच कोविड -19 अशा महामारीच्या काळात सुद्धा जीवाची पर्वा न करता, मग्रारोहयोची अंतर्गत गावामधील प्रत्येक मजुरांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन रोजगार दिलेला आहे. असे असतांना गेल्या तीन चार वर्षांपासून प्रलंबित मागण्या व कोणतेही मानधन वाढ झालेली नाही त्यामुळे मग्रारोहयो संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.

या पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील सहभागी झालेल्या संघटनेच्या प्रमुख मागण्या
खालीलप्रमाणे :
१. मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबांधमध्ये समायोजन करण्यात यावे.
२. पश्चिम बंगाल राज्याच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे.
३. योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्यनिधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी.
४. मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६५ वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी.

वरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त स्वरूपाच्या असून या काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस लोटला असून आज चौथा दिवस उजाळला आहे. आंदोलन सुरू च आहे तरी देखील शासनस्तरावर कोणतीही दखल किंबहुना जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट दिली नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे आंदोलन असेच पुढे सुरू राहील असे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र- राज्य, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहा., क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेट, ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने माहिती देण्यात आली आहे. 





Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();