टॉप बातम्या

मारेगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आगामी महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती सणाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उपविभागीय अधिकारी संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी समिती बांधवांना शासन स्तरावरील माहिती देत, महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही शांततेत साजरी करण्यात यावी असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासह सामाजिक शांतता बिघडणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. सदर बैठकीला शहरातील समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();