सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
कापसाला प्रती क्विंटल 10 हजार, सोयाबीन प्रती क्विंटल 7 हजार, तुर व हरभऱ्याची नाफेड मार्फत नोंद करून त्वरित खरेदी करावे, तर पिक विम्याची रक्कम समसमान लवकरात लवकर देण्यात यावी, शेतातील कापूस चोरी व बॅटरी चोरी, इलेक्ट्रीक मोटर पंप, सानुग्रह अनुदान त्वरित शेतकर्यांना (50000/-) मदत देण्यात यावी, यासह विवीध मागण्यांसाठी रस्ता रोखो करण्यात आला. दरम्यान, मार्गांवरील दोनही बाजूकडील वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले.
या रास्ता रोको आंदोलनाचे वणी विधान सभा मतदार संघांचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात, माजी जि प सदस्य सुनील गेडाम, राजू मोरे, जीवन काळे, मयूर ठाकरे (युवासेना), डॉ मनिष मस्की, किसन मत्ते, गुरूदास घोटेकर, मनोज वादाफळे,अभय चौधरी,श्रीकांत सांबजवार,पंकज बलकी,दिगंबर नावडे, दिवाकर सातपुते, मुकुंद निवल, विजय अवताडे,शुभम लालसरे,राजूभाऊ आसुटकर,गोपी बावणे,गोविंदा मांढरे, अनुप आस्कर,पद्माकर धोबे, तुकारामसह असंख्य कार्यरर्ते, शेतकरी उपस्थित होते.
