सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : महाराष्ट्रातील प्रख्यात लढवय्ये ,पुरोगामी कृतीशील काॅमरेड गोविंद पानसरे यांना कोल्हापुर येथे त्यांच्या घराजवळ दि.16 फेब्रू.2015 रोजी विकृत फॅसीस्टांकडुन भ्याड बेछुट गोळीबार करण्यात आला.
सदर गोळीबारात ते व त्यांच्या पत्नी कॉ.उमाताई गंभीर जखमी झाल्या.त्यातुन उमाताई बचावल्या परंतु दि.20 फेब्रु.15 रोजी उपचारादरम्यान कॉ.पानसरे यांचे दु:खद निधन झाले.या घटनेला आज आठ वषॆ होत आहेत मात्र, त्यांचे मारेकऱ्यांना अद्याप शिक्षा झाली नाही. करीता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 20 फेब्रु.2023 ला राज्यभर "जवाब दो" आंदोलन पुकारले. त्या अंतर्गत झरी तहसील कचेरीवर जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे,राजु पेंदोर,बंडु गोलर,वासुदेव गोहणे,दशरथ येनगंटीवार,ऋषी उलमाले,लता रामटेके,छाया गावंडे ई.चे नेत्रुत्वात प्रचंड महाधरणाआंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सोबतच मारेकऱ्याविरोधात महाराष्ट्र शासनाने कृतीशील होऊन मा.न्यायालयात योग्य ते पुरावे सादर करून तत्परता दाखवावी अशा आशयाचे निवेदन राज्य कॉन्सिल सदस्य कॉ.सुनिल गेडाम,सारंग घाटे,सिद्धार्थ राऊत,अमोल लाबंट,पंकज वेले यांचे नेत्रुत्वात वणी येथेही तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.