सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : घोन्सा येथील श्री संत गजानन महाराज श्रद्धाआश्रमात एकल व समुह नूत्र्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात जवळपास तीस ते चाळीस शाळा वणी येथील डान्स अकॅडमी चे विद्यार्थी तसेच बल्लारशा चंद्रपूर अश्या अनेक ठिकाणाहून समुह व एकल नृत्यचे सादरीकरण झाले होते.
त्यात इंडीयन स्कॉलर्स अकॅडमीच्या विद्याथ्याने
हनुमान चालीसा समूह नृत्य या ग्रुप ने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले तसेच दिंडी ग्रुप ने सुद्धा द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले ..... या यशाला शिक्षक रश्मी थेरे , श्रध्दा राऊत , अजिंक्य कोरडे , पवन पडोळे, प्रफुल मेश्राम , बदकी मॅडम, चालक सचिन कोहळे , यांचे सहकार्य लाभले