Top News

महिला काँग्रेस च्या मारेगाव तालुका पदी मायाताई गाडगे यांची निवड

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे

मारेगाव : जिल्हा महिला काँग्रेस च्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा महिला काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जिल्हाध्यक्षा वंदनाताई आवारी यांनी जाहीर केली.

यामध्ये 48 उपाध्यक्ष,40 सरचिटणीस,36 सरचिटणीस आणि सदस्यांचा समावेश आहे. यात महिला काँग्रेस च्या मारेगाव तालुका पदी मायाताई गाडगे यांची निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी जाहीर करतांना महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्षा वंदनाताई आवारी यांनी नियुक्ती केली.

यावेळी मारेगाव काँग्रेस कमिटी च्या वतीने मायाताई गाडगे यांना नियुक्ती पत्र देऊन उपस्थितांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या नियुक्ती बद्दल नवनिर्वाचित मायाताई गाडगे यांनी खासदार बाळू धानोरकर, जिल्हाध्यक्षा वंदनाताई आवारी, माजी आमदार वामनराव कासावार, नरेंद्र ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, डॉ महेंद्र लोढा, मारोती गौरकार वसंतराव आसुटकर, यादवराव पांडे, तुळशीराम कुमरे, अंकुश माफूर, विनोद आत्राम, गणुजी थेरे, आकाश बदकी, शंकरराव मडावी,समीर सय्यद, अरविंद वखनोर, प्रफुल विखणकर,गंगाधर ठावरी, रवी धानोरकर, नंदेश्वर आसुटकर, गोपाळ खामणकर, सुनील सोमटकर, मोरेश्वर मोघे, धनंजय आसुटकर,माणिक पांगुळ मायाजी पेंदोर,आदी सह सर्व काँग्रेस कमिटीचे व युवक काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. 
Previous Post Next Post