सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत असून पूर, चक्रीवादळ,गारपीट, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची परिमित हानी होते. अशा संकटांतून तालुक्यातील शेतकरी सामोरे जात असतांना आता कापसाचे भाव घसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असल्याने कापसाला प्रति क्विंटल 10,000/- (दहा हजार रुपये) हमी भाव जाहीर करून त्वरित खरेदी करावी, सोयाबीन प्रति क्विंटल 7000/- (सात हजार रुपये), सानुग्रह अनुदान त्वरित द्यावे (50000), पिक विमा लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात समसमान जमा करावी, तसेच शेतातील कापूस चोरी व इलेक्ट्रीक मोटार पंप व झटका बॅटरी चोरांचा पोलिसांकरवी शोध लावून द्यावा अशा आशयाचे निवेदन मारेगाव तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मारेगाव तालुका प्रमुख तथा पं स माजी उपसभापती संजय आवारी यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
दरम्यान,शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवून मारेगाव तालुक्यामध्ये येत्या 15 फेब्रुवारी 2023 रोज बुधवारला 'चक्का जाम आंदोलन' करण्यात येत आहे. अशा ईशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी संजय लांबट, मयूर ठाकरे, मारोती नगराळे, शेखर राऊत, दिवाकर सातपुते, अनंता निब्रड, शरद ताजणे, तुळशीदास दर्वे, गुरूदास घोटेकर, यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.