सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : वणी येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ तथा समाजसेवक डॉ.महेंद्र लोढा यांचा येत्या १६ फेब्रुवारीला वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे मारेगाव येथे नगरपंचायत प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबिराचे उद्घाटन खा.बाळू धानोरकर करणार आहेत.माजी आमदार वामनराव कासावार अध्यक्षस्थानी असतील.काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, वसंतराव आसुटकर, मारोती गौरकार, मुन्ना कुरेशी, यादवराव काळे,शंकरराव मडावी आदींची मंचावर उपस्थित असणार आहे.
मोफत असलेल्या शिबिरात सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी, मोफत औषधी, रक्त तपासणी तथा गरज भासल्यास ईसीजी, एक्सरे, २ डी इको केल्या जाईल.यासह मोतीबिंदू शस्रक्रिया, दुर्बीण द्वारे कुटुंब नियोजन शस्रक्रिया, हायड्रोसील व स्तनावरील गाठीवर मोफत शस्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिरात नामवंत हृदय रोगतज्ञ डॉ.रोहन आईचवार, डॉ.संदीप धुत, मेंदू रोग तज्ञ डॉ.कपिल गेडाम, पोट विकार तज्ञ डॉ.शशांक वंजारी, मूत्र रोगतज्ञ डॉ.पंकज जावंदिया यांचेसह प्रसूती, स्त्री रोग, बाल रोग, दंत, नेत्र, जनरल फिजिशीयन, अस्थी रोग, फिजिओथेरेपी विभागाचे तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत.
तालुक्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अंकुश माफुर, गणुजी थेरे, विजय बोथले, रवी धानोरकर, अशोक धोबे, तुळशीराम कुमरे, दयानंद कुडमेथे, गोपाल खामनकार, समीर सय्यद, मारोती सोमलकर, राजू पचाभाई, प्रफुल्ल विखनकर, रवी पोटे यांचेसह मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने करण्यात आले आहे.