महाराष्ट्रासह 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल बदलले



सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून देशातील 13 प्रांतांचे गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर बदलण्यात आले आहेत. याची घोषणा आज करण्यात आली.

महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि झारखंड अशा अनेक मोठ्या राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. तसेच काही राज्यपालांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सध्या कोणत्याही राज्याचे राज्यपाल करण्यात आलेले नाही.

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांची यादी खालीलप्रमाणे :

• रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
• लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
• लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम
• सीपी राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
• शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
• गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
• निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
• विश्वभूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगड
• अनुसुईया उईके, राज्यपाल, मणिपूर
• एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
• फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
• राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
• ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा, लेफ्टनंट गव्हर्नर, लडाख

कोण आहेत रमेश बैस?

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले रमेश बैस मूळचे छत्तीसगढचे आहेत. ते सात वेळा खासदार राहिले आहेत. आजपर्यंतच्या एकाही निवडणुकीत ते पराभूत झालेले नाहीत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुराचे राज्यपालपदही सांभाळले आहे. २ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेले रमेश बैस १९७८ मध्ये पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी वाजपेयी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

मध्य प्रदेश विभाजन होऊन छत्तीसगढची निर्मिती होण्याआधी त्यांनी मध्यप्रदेशचे आमदार म्हणूनही काम केले आहे. १९८० ते १९८४ दरम्यान ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. लालकृष्ण आडवाणी यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपने त्यांचे तिकिट कापले होते. आडवाणींचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्यात आले, असे त्यांचे समर्थक सांगतात.    
Previous Post Next Post