सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
त्यांनी सुरेश वाडकर, कविता, कृष्णमूर्ती आणि त्यांच्या संगीतातले कितीतरी मोठमोठे कलाकार यांच्या कडून गायन केले होते. इतकेच नाही तर वर्षानुवर्षे आजपर्यंत जी भीम आणि बुद्धाची गाणी वाजवली जात आहेत, ती सर्व गुरुजींची निर्मिती आहे. माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांना पुरस्कार घोषित केला होता.
सुरमणी पंडित प्रभाकरजी धाकडे यांचे हृदय विकाराने आज दि.7 जानेवारी 2023 ला दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबाला हानी सहन करण्याची शक्ती देवो, सर्व कलाकारांसाठी अत्यंत दुःखद बातमी. नागपूर शहरातील सुप्रसिद्ध कलाकार पंडित प्रभाकरजी धाकडे, जे आकाशवाणी, दूरदर्शनचे सर्वोत्कृष्ट कलाकार होते, ते सूरमणी तालासाठी पंडीत प्रभाकरजी धाकडे प्रसिद्ध होते.