टॉप बातम्या

वणी पोलीसांनी दोन संशयित आरोपिंना सर्विसा (छत्तीसगड) पोलिसांच्या दिले ताब्यात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरातील मटका धाड सत्रानंतर चोऱ्यांवर अंकुश लावण्याकरिता वणी पोलीस प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसत आहे. छत्तीसगड येथील चोरीचे वाहन व दोघांना वणीत पकडण्यात वणी पोलिसांना यश आले आहे.  
सूत्राच्या माहितीनुसार दिनांक 7 जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरात एक महिंद्रा पिकअप सि जी वाहन 11 AB 0887 व मागील बाजुस सि जी 11 AB 0886 असे दोन वेगळ्या क्रमांकाचे वाहन येत असलेल्याने पोलीस निरीक्षक शिरसकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे यांनी आपल्या टीम सह यवतमाळ वणी रोड वरील बाकडे पेट्रोल पंप जवळ सापळा रचून वाहन ताब्यात घेतले.
या दरम्यान, रेणुका उर्फ दिपक साहु (19) व चालक किरण कुमार साहु (19) रा. दैलतबाजार जिल्हा सारंगड (छत्तीसगड) दोघांची कसून चौकशी केली असता तक्रारदार तुलाराम जनकराम साहू गोपालपूर यांचे तक्रारीवरून दोघा विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. आणि दोन्ही संशयितांना सर्विसा (छत्तीसगड) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे, सहायक फौजदार सुदर्शन वानोळे, डोमाजी भादीकर, सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरींदर भारती, पुरुषोत्तम दडमल, सागर सिडाम आदींनी केली आहे.


     
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();