सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : राज्याचे दुसरे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्त बेलदार समाज बहूउद्देशिय संस्था, वणीच्या वतीने दिनांक 10 जानेवारी ला सकाळी 9 वाजता कर्मवीर दादासाहेब कन्नमवार चौक, विराणी हॉल रोड येथे माल्यार्पण कार्यक्रम तसेच सायंकाळी 6 वाजता, शासकीय (govt.) हायस्कूल, वणी येथील खुले प्रांगणात मा प्रा हरी नरके प्रसिद्ध वक्ते, विचारवंत, लेखक व अभ्यासक पुणे यांचे जाहीर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे, राष्ट्रहितासाठी ओबीसी (वि जे, एन टी, एस बी सी) ची जनगणना करणे काळाजी गरज. या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
संस्थेच्या वतीने आयोजित थोर स्वातंत्र्य सेनानी व राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्ताने प्रा नरके यांच्या होणाऱ्या व्याख्यानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन संस्था अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार यांनी केले आहे.