सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
चंद्रपूर : दि. ५ जानेवारी ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर केंद्रातून मराठी बाणा, चंद्रपूर या संस्थेच्या वृंदावन या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. वृंदावन या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चंद्रपूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
अंजना उत्तम बहुउद्देशीय संस्था, चिखलगाव या संस्थेच्या ए... आपण चहा घ्यायचा या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि अस्मिता रंगायतन सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था, यवतमाळ या संस्थेच्या किनारा या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक बकुळ धवने (नाटक- वृंदावन), द्वितीय पारितोषिक अशोक आष्टीकर (नाटक-किनारा), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक हेमंत गुहे (नाटक-वृंदावन), द्वितीय पारितोषिक राजेश्वर पिंपरवार (नाटक-नागपद्म), नेपथ्य : प्रथम पारितोषिक दिगंबर इंगळे (नाटक- परफेक्ट मिसमॅच), द्वितीय पारितोषिक सतीश काळबांडे (नाटक- पूर्णविराम), रंगभूषा प्रथम पारितोषिक मेघना शिंगरु (नाटक-वृंदावन), द्वितीय पारितोषिक शुभदा कक्कड (नाटक- पूर्णविराम), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अमित राऊत (नाटक- किनारा ) व सावली देठे (नाटक- परफेक्ट मिसमॅच), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे बकुळ धवने (नाटक- वृंदावन), रोहीणी उईके (नाटक-वृंदावन), सुमेधा श्रीनामे (नाटक- बातमीची गोष्ट), स्नेहल राऊत (नाटक- पूर्णविराम), तुषार चहारे (नाटक-वृंदावन), ऋवेद खोंड (नाटक-घर देता का घर), प्रशांत गोडे (नाटक-चूक भूल घ्यावी द्यावी), अशोक सोनटक्के (नाटक- ए आपण चहा घ्यायचा).
दि. १५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. सुहास भोळे, श्री. मुकुंद महाजन आणि श्री. विनोद डावरे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अभिनंदन केले आहे.