सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव तालुक्यात 26 जानेवारी 'प्रजासत्ताक दिन' मोठया थाटात सपन्न झाला. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही प्रजासत्ताक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले. या सोहळ्या मध्ये जि.पं. शाळा हायस्कुल, महाविद्यालय कान्व्हेंट सह अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या कलाकारांनी सहभाग घेतला होता.
तालुक्यातील मार्डी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण कला सादरीकरणासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला होता. या मंच बहारदार नृत्य सादर करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. यात ईन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कूल ला प्रथम क्रमांक मिळाला. या सांस्कृतिक कार्यक्रमात अंगणवाडी क्र 1, अंगणवाडी केंद्र क्रमांक 2, इन्स्पायर इंग्लिश मिडीयम स्कूल, इंडियन स्कॉलर ऍकेडमी,जिल्हा परिषद शाळा, आदर्श हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हर्षदा गानफाडे या विद्यार्थीनीने 'आई ' ही थीम सादर करताना दर्शकांच्या डोळ्यात पाणी आणले.
मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संस्कृतीक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुधाकर डाहुले, सदस्य सुरेश चांगले, गणेश कनाके, सूरज पंडिले, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, भास्करराव धानफुले, किसनराव चौधरी, माणिक कांबळे, प्रफुल झाडें, राजकुमार बोबडे, बेबी मोहुर्ले, मनीषा चौधरी, मंगला टिपले, शोभा कालर, छाया पुसाटे उपस्थित होते. सूत्रसंचालन भास्कर राऊत यांनी केले. या कार्यक्रमाचे परीक्षण जि प शाळेचे मुख्याध्यापक गिरिधरराव राऊत, सुरेश नाखले यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनी चिमुकल्यांनी केले मार्डीवासियांना मंत्रमुग्ध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 27, 2023
Rating:
