टॉप बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आता 'आर या पार' लढाई

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता 'आर या पार' लढाई चे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांना कृषी पंप्पाला दिवसाला वीज पुरवठा करण्यात यावा, तसेच पीक विम्याची रक्कम त्वरित मिळाली पाहिजे, बेरोजगारी, एपीएल शेतकऱ्यांचे बंद झालेले रास्त धान्य त्वरित सुरू करावे, या प्रमुख मागण्या घेऊन येत्या 20 जानेवारी ला मनसेच्या वतीने वणी येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चात वणी उपविभागातील झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सोमवार दि.16 जानेवारी रोजी मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. येथील शासकीय मैदान येथून सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा धडकणार आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();