सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी जामणी : शेतकऱ्यांचे २ जानेवारी पासुन तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू होते. तिसऱ्या दिवशी गुरुवारी खासदार बाळू धानोरकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण कर्ते यांचे सोबत चर्चा करून जिल्हाधिकारी यांचेसोबत फोनवर चर्चा करून खासदार बाळू धानोरकर यांनी उपोषण कर्ते यांना लिंबू शरबत पाजून तिसऱ्या दिवशी उपोषणाची सांगता केली.
शेतकऱ्यांच्या पिकांचे या वर्षी अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसान झाले. शासनाने ठरविलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमाची रक्कम बँकेच्या खात्यात टाकली नाही त्यामुळे १०० टक्के नुकसान भरपाई ४६ हजार २०० रुपये व १२.१ टक्के व्याज प्रती हेक्टरी देण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण कर्ते उपोषण सोडणार नाही यावर ठाम होते.
तिसऱ्या दिवशी गुरुवारी खासदार बाळू धानोरकर यांनी तहसीलदार सोबत मिटिंग घेतली, त्यानंतर जिल्हाधिकारी सोबत मोबाईल वर बोलणे झाले या बोलण्यात आचार संहिते मुळे सध्या उपोषणाला स्थगिती देण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर व उपोषण कर्ते यांचे सोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज गुरुवार ला दुपारी ४ वाजता चर्चा होणार आहे असे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले. वरून खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार व आशिष खुलसंगे यांनी उपोषण कर्ते शेतकरी संदीप बुर्रेवार, निलेश येल्टिवार, राहुल धांडेकर, हरिदास गुर्जलवार, नितिन खडसे, गंगाधर आत्राम, सुभाष कुडमेथे, चेतन मॅॅकलवार, राकेश गालेवार यांना लिंबू शरबत पाजून संध्याकाळी ६:०० वाजता उपोषणाला स्थगिती दिली.
आज गुरुवार ला दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा झाल्यानंतर उपोषण कर्ते यांच्या समाधानकारक मागण्या मंजूर न केल्यास पुन्हा आमरण उपोषणास बसणार अशी माहिती संदीप बुर्रेवार यांनी माध्यमांना दिली.