सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : शहरातील मार्डी चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी केली. यावेळी घेण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्याला नगराध्यक्ष डॉ मनीष मस्की यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते साठे काका उपस्थित होते. तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनकार्यावार प्रकाश टाकतांना त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास मांडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय माळी महासंघ, भारतीय बौद्ध महासंघ, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व वंचित बहुजन आघाडी, मारेगाव आदींनी परिश्रम घेतले.