टॉप बातम्या

रासेयो शिबिरात तरुणाईच्या वेगळ्या वाटा यावर युवा संवाद..



सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

 जिबगाव :  राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली व ग्रामपंचायत जिबगाव च्या वतीने आयोजित महाविद्यालय स्तरीय विशेष शिबिर दिनांक 16 जानेवारी 22 जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे यामध्ये 19 जानेवारीला बौद्धिक सत्रामध्ये 'तरुणाईच्या वेगळ्या वाटा' यावर युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये डॉ. सविता गोविंदवार यांनी युवकांशी संवाद साधला स्वतःला ओळखून परंपरागत वाटा न निवडता वेगळ्या वाट कशी निवडता येईल व आपलं व्यक्तिमत्व कसं समृद्ध करता येईल यावर दिलखुलास गप्पाा तरुणाईशी मारल्या यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. दिलीप कामडी, डॉ. रामचंद्र वासेकर , प्रा. प्रशांत वासाडे, डॉ. राजश्री मा

र्कंडेवार प्रा.देवीलाल वाताखेरे प्रा. स्मिता राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन तन्वी मुनघाटे तर आभार रुपाली साखरे हिने मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();