टॉप बातम्या

रासेयो शिबिरात माती परीक्षण व शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार 

जिबगाव - राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली व ग्रामपंचायत जिबगाव च्या वतीने आयोजित महाविद्यालय स्तरीय विशेष शिबिर दिनांक 16 जानेवारी 22 जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे यामध्ये 19 जानेवारीला ऍग्रो फोरमच्या वतीने माती परीक्षण व शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली यावेळी मार्गदर्शक म्हणून डी. आर. पानसे कृषी पर्यवेक्षक सावली , व्हि. व्ही. साखरे कृषी सहाय्यक सावली , पि. के. जोंधळे कृषी सहाय्यक बोदली आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे व मातीचे आरोग्य जाणावे त्यानुसार खताची मात्रा पिकाची निवड करावे. राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील ऍग्रो फोरमच्या वतीने माती परीक्षण करून देण्याची शेतकऱ्यांसाठी सोयी उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन डी. आर.पानसे यांनी केले यावेळी प्रा.प्रशांत वासाडे डॉ. राजश्री मार्कंडेवार प्रा.देवीलाल वाताखेरे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. दिलीप कामडी, डॉ. रामचंद्र वासेकर , प्रा. स्मिता राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();