सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडल्या. यात सावली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीचा समावेश होता, आज (११ जाने.) रोजी सदर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली.
यात बोथली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेस प्रणित चे नरेश पा.गड्डमवार यांची एकमताने निवड करण्यात आली, तसेच नवेगाव तुकुम ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपदी काँग्रेस प्रणित साईनाथ मडावी तर गेवरा बुज मध्ये काँग्रेस प्रणित पारेश्वर चौधरी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
बोथली ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस प्रणित चे ७ सदस्य तर बीजेपी समर्थित २ सदस्य विजयी झाले होते, तर नवेगाव तुकुम मध्ये सात सदस्यापैकी ५ काँग्रेस प्रणित तर २ बीजेपी समर्थीत सदस्य विजयी झाले होते, तसेच गेवरा बुज मध्ये सरपंच हे बीजेपी प्रणित विजयी झाले तर सात पैकी सात हि काँग्रेस प्रणित सदस्य विजयी झाले.
यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांकडुन ग्रामस्थांनी गाव विकासाच्या मोठ्या अपेक्षा ठेवत नवीन कमेटिचे अभिनंदन केले.