टॉप बातम्या

खडकी (बुरांडा) येथील युवक कोसारा (सोईट) मार्गांवर मृत अस्वस्थेत आढळून आला

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गावाकडे परतीचा प्रवास करतांना कोसारा (सोईट) या मार्गांवर रस्त्याच्या बाजूला पडून असलेल्या युवकाचा मृतदेह आज दि.१२ जाने. गुरुवारला सकाळी दहा वाजता येजा करणाऱ्यांच्या निदर्शनास आले. या घटनेने खडकी (बुरांडा) येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मारेगाव तालुक्यातील खडकी (बुरांडा) येथील गोलू उर्फ सुहास गजानन आडे (१८) असे त्याचे नाव आहे. हा युवक आपल्या नातेवाइक असलेल्या चंद्रपूर जिल्हा वरोरा तालुक्यातील बोरी (वडकेश्वर) येथून आपल्या मूळगावी दुचाकी क्र. एम एच २९ ए ए ५०२८ ने येत असतांना कोसारा (सोईट) रस्त्यावर सायंकाळी अज्ञात वाहनाने जबर धडक दिली असा कयास आहे. यात गोलू हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला जाऊन आदळला. यातच तो गतप्राण झाला.
मॉर्निंगला या रस्त्याने येजा सुरू असतांना ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आली.
आईवडिलांना एकुलता एक चिरंजीव नियतीने हरविल्याने खडकी (बुरांडा) येथे शोककळा पसरली आहे. मारेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदना नंतर त्याचे वर दुपारी ४.३० च्या दरम्यान अत्यसंस्कार करण्यात आले. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();